वेणेगाव येथे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग व्यंकटराव घोरपडे यांचे निधन
प्रतिनिधी - वेणेगाव येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग व्यंकटराव घोरपडे (वय ७६) यांचे दीर्घ आजाराने दि. ६ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा-सून, मुलगी-जावई, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.
“भाऊ” म्हणून सर्वत्र परिचित असलेले पांडुरंग घोरपडे हे अतिशय मनमिळाऊ, शांत स्वभावाचे होते. त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे परिसरात त्यांचा मोठा स्नेहसंबंध होता. त्यांच्या जाण्याने वेणेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचे अग्नीसंस्कार दि. ७ जानेवारी रोजी वेणेगाव येथील कृष्णा नदी काठी होणार आहेत.
शोकाकुल कुटुंबीयांप्रती सर्व स्तरातून संवेदना व्यक्त होत आहेत.

Post a Comment
0 Comments