सातारा : सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दि. 9 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ते दि. 22 फेब्रुवारी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यात शस्त्र बाळगणे तसेच विनापरवानगी जमाव जमविण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र यात्रा, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ तसेच अंत्यविधी यांसारख्या अत्यावश्यक कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही.
तसेच शांततेच्या मार्गाने कोणताही कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास संबंधितांनी पोलीस विभागाची लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. पोलीस अधीक्षक किंवा संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक यांची परवानगी घेतल्यास संबंधित कार्यक्रमास या आदेशातून सूट दिली जाईल.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments