लक्ष्मण शिंदे सर यांचे निधन
वेणेगाव (प्रतिनिधी) - वेणेगाव (ता. सातारा) येथील लक्ष्मण पांडुरंग शिंदे सर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. परिसरात ते “भाऊ” या नावाने सर्वत्र परिचित होते.
शिंदे सर यांनी रयत शिक्षण संस्था मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्य करत असताना अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. त्यांच्या साध्या, प्रेमळ आणि माणुसकीने ओतप्रोत स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.
ते सर्वांना आपुलकीने जोडणारे, मार्गदर्शन करणारे आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी,मुलगा, सून, मुली, जावई तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आठवणी आणि संस्कार हेच आता सर्वांसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहेत

Post a Comment
0 Comments