Type Here to Get Search Results !

वेणेगाव येथे गुढीपाडवा उत्साहात साजरा; वार्षिक पंचांग वाचन व वृक्षारोपण

 वेणेगाव येथे गुढीपाडवा उत्साहात साजरा; वार्षिक पंचांग वाचन व वृक्षारोपण

वेणेगाव, (प्रतिनिधी) : हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा सण गुढीपाडवा वेणेगाव येथे पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी सदगुरु श्री मलंगनाथ महाराज मठात नित्यपूजा पार पडल्यानंतर सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत गुढी उभारण्यात आली. यानंतर दुपारी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार नवीन वर्षाची सुरुवात वार्षिक पंचांग वाचनाने करण्यात आली. गावातील मारुती मंदिरात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचांग पूजन करून त्याचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांना गुळ, खोबरे व लिंबाचा प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच सदगुरु श्री मलंगनाथ महाराज मठातील भंडाऱ्याचा वार्षिक हिशोब सर्वांसमोर वाचून दाखवण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नागरिक, मार्गदर्शक, युवा वर्ग व सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत मारुती मंदिरासमोर पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमांमुळे गावात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते



Post a Comment

0 Comments