Type Here to Get Search Results !

वीरपत्नी कमल ढाणे यांचा सांगलीत सन्मान

 वीरपत्नी कमल ढाणे यांचा सांगलीत सन्मान

नागठाणे, ता. २५ : पाडळी (ता. सातारा) येथील वीरपत्नी कमल गणपत ढाणे यांचा तोफखाना दिनानिमित्त सांगली येथे विशेष सन्मान करण्यात आला.

२१६ मध्यम तोफखाना संघटनेतर्फे हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभेदार धोंडीराम शिंदे, सुभेदार शंकर खराडे, ऑनररी कॅप्टन संतोष चव्हाण, नायब सुभेदार रवींद्र इंगवले तसेच लष्करातील आजी-माजी अधिकारी व सैनिक उपस्थित होते.

कमल ढाणे यांचे पती गणपत ढाणे हे २१६ मिडियम रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांना वीरमरण आले. त्यानंतर निरक्षर असूनही कमल ढाणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या एकुलत्या एका मुलाचे संगोपन करून त्याला घडविले.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांचा मुलगा अजयकुमार ढाणे, स्नुषा सुषमा ढाणे व कुटुंबीय उपस्थित होते.

छायाचित्र ओळ :

सांगली : वीरपत्नी कमल ढाणे यांचा सन्मान करताना मान्यवर.





Post a Comment

0 Comments