Type Here to Get Search Results !

औषध संशोधनात कराडचा मान उंचावला डॉ. अमितकुमार खाडे यांना आंतरराष्ट्रीय पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप

 औषध संशोधनात कराडचा मान उंचावला

डॉ. अमितकुमार खाडे यांना आंतरराष्ट्रीय पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप

कराड येथील संशोधक, अधिव्याख्याता आणि ह्यूमन या आंतरराष्ट्रीय जर्नलचे मुख्य संपादक डॉ. अमितकुमार आनंदराव खाडे यांना आशिया-आफ्रिका डेव्हलपमेंट कौन्सिल आणि डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप प्रदान करण्यात आली.

डॉ. खाडे यांनी २०२४ मध्ये पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर औषध क्षेत्रातील संशोधनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी विकसित केलेले ब्रिक अँड क्लिक मॉडेल ऑफ फार्मसी हे संशोधन पारंपरिक औषध दुकाने आणि आधुनिक ऑनलाईन फार्मसी यांच्यातील दरी कमी करणारे ठरत आहे. या अभिनव संकल्पनेचा लाभ देशातील सुमारे ९.५० लाख फार्मसींना होऊ शकतो. या संशोधनासाठी त्यांना भारत सरकारकडून कॉपीराइटही प्राप्त झाला आहे.

संशोधनाबरोबरच डॉ. खाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष येथे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळत आहे.

या यशामागे डॉ. कुणाल पाटील, डॉ. अविनाश पवार, डॉ. राहुल पोळ आणि डॉ. प्रल्हाद मुदाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. अमितकुमार खाडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील संशोधन वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.



Post a Comment

0 Comments