वेणेगावचे वसंतराव सूर्यवंशी यांचे निधन
वेणेगाव, ता. सातारा : वेणेगाव येथील ज्येष्ठ व सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व कै. वसंतराव रामचंद्र सूर्यवंशी (भाऊ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वेणेगाव परिसरासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
भाऊ हे परिसरात "भाऊ" तसेच "मामा" या नावाने सर्वत्र परिचित होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, उत्साही व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावरचे कायम स्मितहास्य आणि प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करण्याची सवय यामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली होती. समाजात सर्वांशी प्रेमाने व आदराने वागणारे भाऊ यांच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
कै. वसंतराव सूर्यवंशी यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
टिप : कै. वसंतराव रामचंद्र सूर्यवंशी (भाऊ) यांचे सावडणे तसेच दशक्रिया विधी गुरुवार दि. 11 जून 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता वेणेगाव येथील कृष्णा नदीच्या तीरावर संपन्न होणार आहेत.

Post a Comment
0 Comments