कराड उत्तरच्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!
आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश; शेत पानंद रस्त्यांसाठी ७.५० कोटींचा निधी मंजूर
वेणेगाव | प्रतिनिधी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत शासनाने शेत पानंद रस्त्यांच्या विकासासाठी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पानंद रस्त्यांच्या कामांना गती मिळणार असून, हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
या निधीसाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
कराड उत्तर हा कृषिप्रधान मतदारसंघ असून सुमारे ८० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. पानंद रस्त्यांच्या अभावामुळे शेतमालाची वाहतूक, शेतात ये-जा आणि पावसाळ्यातील हालअपेष्टा वाढत होत्या. मंजूर निधीतून दर्जेदार पानंद रस्ते तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांसह शेतात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होऊन उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होणार आहे.
विशेष चौकट | आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले...
"कराड उत्तरमधील शेतकऱ्यांना दर्जेदार पानंद रस्ते उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ७.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे."

Post a Comment
0 Comments